श्री आनंद भारती समाज संस्थेतर्फे आयोजित दोन दिवसीय ओव्हर आर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेत विद्युत प्रकाश झोतात झालेल्या अंतिम लढतीत टाईट रायडर्स संघाने टायटन्स संघाचा ३७ – २५ असा १२ धावांनी पराभव अजिंक्यपद संपादन केले. स्पर्धेत १६ संघ सहभागी झाले होते. सामन्यात १० धावा आणि हॅटट्रिकसह चार बळी मिळवणाऱ्या सम्राट नाखवाची स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड करण्यात आली.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना जेष्ठ क्रिकेटपटू हरेश्र्वर मोरेकर म्हणाले, मर्यादित षटकांचे क्रिकेट म्हणजे डावपेचांचे गणित.त्यात जो वरचढ तो विजयी,याचा प्रत्यय देणारा अंतिम सामना होता. पारितोषिक वितरण प्रसंगी समाजसेवक राजेश व्हायाळ पाटील, कार्यवाह संदिप कोळी, आनंद ठाणेकर, सुरेन कोळी, कमलाकर कोळी, कैलास मुंबईकर, विवेक मोरेकर, सुनील कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.
संक्षिप्त धावफलक : टाईट रायडर्स : ५ षटकात ३ बाद ३७ (सम्राट नाखवा १०, साईप्रसाद भगत नाबाद ८) विजयी विरुद्ध टायटन्स : ५ षटकात ७ बाद २५ (सम्राट नाखवा २-०-४ हॅटट्रिकसह ४ बळी) सर्वोत्तम फलंदाज – भावेश कोळी – टायटन्स, गोलंदाज – प्रदीप पिंगळे – रायडर्स, सामनावीर – साईप्रसाद भगत. श्री आनंद भारती समाज संस्थेतर्फे आयोजित दोन दिवसीय ओव्हर आर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेत विद्युत प्रकाश झोतात झालेल्या अंतिम लढतीत टाईट रायडर्स संघाने टायटन्स संघाचा ३७ – २५ असा १२ धावांनी पराभव अजिंक्यपद संपादन केले. स्पर्धेत १६ संघ सहभागी झाले होते. सामन्यात १० धावा आणि हॅटट्रिकसह चार बळी मिळवणाऱ्या सम्राट नाखवाची स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड करण्यात आली.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना जेष्ठ क्रिकेटपटू हरेश्र्वर मोरेकर म्हणाले, मर्यादित षटकांचे क्रिकेट म्हणजे डावपेचांचे गणित.त्यात जो वरचढ तो विजयी,याचा प्रत्यय देणारा अंतिम सामना होता. पारितोषिक वितरण प्रसंगी समाजसेवक राजेश व्हायाळ पाटील, कार्यवाह संदिप कोळी, आनंद ठाणकर, सुरेन कोळी, कमलाकर कोळी, कैलास मुंबईकर, विवेक मोरेकर, सुनील कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.
संक्षिप्त धावफलक : टाईट रायडर्स : ५ षटकात ३ बाद ३७ (सम्राट नाखवा १०, साईप्रसाद भगत नाबाद ८) विजयी विरुद्ध टायटन्स : ५ षटकात ७ बाद २५ (सम्राट नाखवा २-०-४ हॅटट्रिकसह ४ बळी) सर्वोत्तम फलंदाज – भावेश कोळी – टायटन्स, गोलंदाज – प्रदीप पिंगळे – रायडर्स, सामनावीर – साईप्रसाद भगत.