Skip to content
March 3, 2026
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.

S9 TV NEWS

` S9 News
Primary Menu
  • HOME
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • क्रीडा
Live
  • Home
  • क्रीडा
  • ५२वी कुमार कुमारी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २०२५

५२वी कुमार कुमारी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २०२५

S9 TV NEWS December 2, 2025
IMG-20251201-WA0015.jpg
Like, Follow, Subscribe

कुमार विभागात ठाणे ग्रामीण व कुमार विभागात पालघर या संघानी राज्य कुमार व कुमारी गटाचे विजेतेपद पटकाविले. 
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएसशनच्या मान्यतेने पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमान पदाखाली पिंपरी चिंचवड बोपखेल येथील दिवंगत श्रीरंग धोदाडे क्रीडानगरीत विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे व राकेशभाऊ घुले कबड्डी संघ व युवा प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ५२ वी कुमार व कुमारी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी व आमदार चषक कबड्डी स्पर्धा पार पडली. 
स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी रात्री उशीरा झालेल्या मुलांच्या शेवटच्या मिनिटापर्यंत अत्यंत रोमहर्षक झालेल्या  अंतिम सामन्यात ठाणे ग्रामीण संघाने अहमदनगरचा संघाचा ३९-३७ अशा गुण फरकाने पराभव करून विजय मिळविला. आक्रमण आणि बचाव यांचे योग्य मिश्रण असलेल्या दोन्ही तुल्यबळ संघाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. ठाणे ग्रामीणच्या जीतसिंग सैंनी संयमी खेळा मुळे आपल्या संघाला विजय मिळवणे शक्य झाले. मध्यंतरला ठाणे ग्रामीण २३-१६ असा पिछाडीवर होता. मात्र मध्यंतरानंतर जीतसिंग सैनी व स्मित पाटील यांनी जोरदार आक्रमण करीत अहमदनगरच्या अभिजित साळुंखेचा व सार्थक शिंदेचा बचाव भेदला. त्यामुळे मध्यंतरानंतर सामना ठाणे ग्रामीणच्या बाजुला झुकविण्यात त्यांना यश आले. ठाणे ग्रामीणच्या समन हरिजन याने सुरेख पकडी घेत आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात हात भार लावला. सामन्याच्या पुर्वार्धात अहमदनगर संघाच्या वैदांत उंदरे व प्रशांत उपलकर यांनी आक्रमक सुरवात करून आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली होती. तर अभिजित साळुंखे व सार्थक शिंदे यांनी जीत सिंग सैनीच्या लागोपाठ चार पकडी घेत त्याच्यावर दबाव वाढविला होता. मात्र उत्तरार्धात शेवटच्या मिनिटा पर्यंत जीतसिंग सैनीने हा दबाव झुगारून प्रतिहल्ला करीत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
कुमारी विभागात पालघरच्या संजना भोईर व हनी सोलमुत्तू यांच्या वेगवान चढाया व काजल भोईरने केलेल्या पकडींमुळे पिंपरी चिंचवड संघाचा ५३- ४५ असा पराभव करीत स्पर्धेचे अंतिम विजेतपद पटकाविले. मध्यंतराला पालघर संघाकडे ३१-२० अशी आघाडी होती. सामन्याच्या पुर्वार्धातच संजना भोईर हिने जबरदस्त आक्रमण करीत पिंपरी चिंचवड संघावर दोन लोन लावत आपले इरादे स्पष्ट केले. तीने निडरपणे खेळ करीत पिंपरी चिंचवडच्या सिध्दी गायकवाड व नम्रता सावंत यांचा बचाव भेदत आपल्या संघाला चांगली आघाडी मिळवून दिली. ही आघाडी उत्तरार्धात ही कायम राखत हा सामना जिंकला. पिंपरी चिंचवडच्या संतोषी थोरवे व किर्ती कडगंची यांनी वारंवार पालघरचा बचाब भेदण्याचा प्रयत्न केला, मात्र या प्रयत्नात त्यांना यश न आल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. पिंपरी चिंचवडच्या सिध्दी गायकवाडने पकडी घेतल्या. तत्पुर्वा झालेल्या कुमारी विभागात उपांत्य सामन्यात पालघर संघाने सांगली संघाचा ४४-२३ असा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर पिंपरी चिंचवड संघाने गतविजेत्या पुणे ग्रामीण संघाचा ४८-४३ असा अनपेक्षित पराभव केला.
कुमार विभागात अहमदनगर संघाने परभणी संघाचा ५१-५० असा अवघ्या एक गुणांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर ठाणे ग्रामीण संघाने पुणे ग्रामीण संघाचा ३७-३६ असा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी स्पर्धा आयोजक शशिकांत घुले, दिनेश धावडे, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे खजिनदार मंगल पांडे,मालोजी भोसले, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष दत्तात्रय कळमकर, हिरीबाई घुले, निलेश पांढरकर, छत्रपती पुरस्कार प्राप्त राजू घुले, राकेश भाऊ घुले कबड्डी संघ व युवा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आदी उपस्थित होते.

Continue Reading

Previous: २५ वा नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार….
Next: ठाणे पालिकेच्या प्रारूप मतदार यादी मध्ये झोल…
  • FwZLKEnacAA0XiF
  • img-20250602-wa00015808276882074419283.jpg
  • 473241588_9184857851597815_2764842180287072871_n
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.
"Copyright © 2025 | S9 TV News | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

LinkedIn

WhatsApp

Copy Link
×