Skip to content
March 7, 2026
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.

S9 TV NEWS

` S9 News
Primary Menu
  • HOME
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • क्रीडा
Live
  • Home
  • ताज्या बातम्या
  • रमेश चव्हाण सर मला गुरुस्थानी – रामचंद्र भोईर

रमेश चव्हाण सर मला गुरुस्थानी – रामचंद्र भोईर

S9 TV NEWS November 5, 2025
IMG-20251105-WA0081.jpg
Like, Follow, Subscribe

ठाणे जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेची १९८० साली स्थापना झाली. ठाणे जिल्ह्यातील शहापूर सारख्या ग्रामीण भागात श्री आदर्श मंडळ शहापूर या व्यायामशाळेच्या माध्यमातून व्यायामशिक्षक म्हणून मी कार्यरत होतो. पण १९८६ साली मी पाचव्या आनंद श्री किताबाचा मानकरी ठरलो आणि मी रमेश चव्हाण सरांशी संपर्कात आलो. त्यानंतर वेळोवेळी सरांचे मार्गदर्शन मिळत गेले. ते नेहमीच मला गुरुस्थानी होते असे भावपूर्ण मनोगत जिल्हा आणि राज्य स्तरावर आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी ठरलेले रामचंद्र भोईर यांनी व्यक्त केले. नुकत्याच पार पडलेल्या ४३ व्या आनंद श्री ठाणे जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी दुसरा रमेश रामजी चव्हाण स्मृती पुरस्कार श्री आनंद भारती समाजाचे अध्यक्ष हरेश्र्वर मोरेकर यांच्या हस्ते पुरस्कार स्विकारल्यानंतर सत्कारास उत्तर देताना रामचंद्र भोईर बोलत होते. याप्रसंगी यजमान संस्थेचे कार्यकारिणी सदस्य कमलाकर कोळी, जेष्ठ सदस्य प्रल्हाद नाखवा, ठाणे जिल्हा हौशी शरीरसौष्ठव पदाधिकारी सर्वश्री विनायक केतकर, संतोष मलबारी, रिझवान फरीद आदी मान्यवर उपस्थित होते.

Continue Reading

Previous: गोपीकृष्ण महोत्सवाला ठाणेकरांची भरभरून दाद…
Next: आली मोठी शहाणी च्या गोव्यातील चित्रीकरणाचा श्री गणेशा….
  • FwZLKEnacAA0XiF
  • img-20250602-wa00015808276882074419283.jpg
  • 473241588_9184857851597815_2764842180287072871_n
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.
"Copyright © 2025 | S9 TV News | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

LinkedIn

WhatsApp

Copy Link
×