Skip to content
October 6, 2025
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.

S9 TV NEWS

` S9 News
Primary Menu
  • HOME
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • क्रीडा
Live
  • Home
  • ताज्या बातम्या
  • श्री गणेशाची कृपादृष्टी सगळ्यांवर राहो!

श्री गणेशाची कृपादृष्टी सगळ्यांवर राहो!

S9 TV NEWS August 27, 2025
IMG-20250827-WA0012.jpg
Like, Follow, Subscribe

महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले महापालिका कर्मचाऱ्यांच्या गणेशाचे पूजन….

श्रीगणेशाची कृपादृष्टी सगळ्यांवर राहो, श्रीगणेशाच्या कृपेने ठाणे महापालिकेची कीर्ती कायम वृद्धिंगत होवो, अशी प्रार्थना ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली. ठाणे महापालिका कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीचे पूजन आयुक्त राव आणि त्यांच्या पत्नी प्रियांका राव यांनी केले. राव यांचे सुपुत्र आंजनेय, भाचे अविनाश आणि अनुराग शाही हेही पूजेला उपस्थित होते. ठाणे महापालिका कर्मचारी गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे ४३वे वर्ष आहे. मंडळाचे अध्यक्ष असलेल्या महापालिका आयुक्त यांनी गणेशोत्सवाच्या सर्व ठाणेकरांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे (२), उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे, उपायुक्त मीनल पालांडे, मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी, मंडळाचे सचिव पी. एच. पाटील, कार्यवाह आर. के. पाटील आदी उपस्थित होते.

Continue Reading

Previous: सौम्याचा नवा राष्ट्रकुल विक्रम…
Next: कॉ. गोदावरी परुळेकरांच्या जन्मदिनी तळासरीच्या महाविद्यालयात त्यांच्या पुतळ्याचे अनावरण….
  • FwZLKEnacAA0XiF
  • img-20250602-wa00015808276882074419283.jpg
  • 473241588_9184857851597815_2764842180287072871_n
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.
"Copyright © 2025 | S9 TV News | MoreNews by AF themes.