
राज्य कंत्राटदार महासंघाचे ठाण्यात धरणे आंदोलन
कर्ज काढून घेतलेला सरकारी निधी जातो कुठे ? – मंगेश आवळेगणेशोत्सव तोंडावर आलेला आहे. अनेक कंत्राटदारांनी कर्ज काढून शासनाची कामे केली आहेत. मात्र, त्यांना त्यांची देयके दिलीच जात नाहीत. एकीकडे सरकार कोट्यवधींची कर्जे घेत आहे. मात्र, कंत्राटदारांना निधी दिला जात नाही. हा निधी जातो कुठे? असा सवाल करीत राज्य कंत्राटदार महासंघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मंगेश आवळे यांच्या नेतृत्वाखाली ठेकेदारांनी भरपावसात जोरदार धरणे आंदोलन केले.
गणेशोत्सव तोंडावर आलेला आहे. अनेक कंत्राटदारांनी कर्ज काढून शासनाची कामे केली आहेत. मात्र, त्यांना त्यांची देयके दिलीच जात नाहीत. एकीकडे सरकार कोट्यवधींची कर्जे घेत आहे. मात्र, कंत्राटदारांना निधी दिला जात नाही. हा निधी जातो कुठे? असा सवाल करीत राज्य कंत्राटदार महासंघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मंगेश आवळे यांच्या नेतृत्वाखाली ठेकेदारांनी भरपावसात जोरदार धरणे आंदोलन केले. राज्य शासनाच्या विविध योजनेंतर्गत राज्यातील कंत्राटदार कामे करीत असतात. मात्र, त्यांची सुमारे ९० हजार कोटी रूपयांची देयके रखडली आहेत. ही देयके अदा करण्यासाठी राज्य कंत्राटदार महासंघाचा संघर्ष सुरू आहे. त्याच अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कंत्राटदारांनी धरणे आंदोलन केले. याप्रसंगी कंत्राटदारांनी , आमचे पैसे मिळविण्यासाठी आम्ही गेल्या दोन वर्षांपासून संघर्ष करीत आहोत. तरीही आमची ९० हजार कोटी रूपयांची देयके अदा करण्यात आलेली नाहीत, असे म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळेस मंगेश आवळे यांनी, शेजारी असलेल्या पोलीस वसाहतीच्या दुरूस्तीचे काम करणाऱ्यास २८ कोटी दिले आहेत. एका कंत्राटदाराला एवढा निधी दिला जातो अन् इतर कंत्राटदारांना रस्त्यावर आणले जात आहे. एकूणच पाहता, नियोजनात हे सरकार पूर्णपणे फोल ठरलेले आहे. इन्फ्रावाल्यांनाच हे सरकार पोसत आहे. आम्ही दर आठवड्याला संबधित मंत्र्यांना पत्र पाठवित आहोत. मात्र, सरकारला आमच्या समस्या पाहण्याकडे वेळच नाही. आज भर पावसात कंत्राटदार काम करीत आहेत. तरीही सरकार कंत्राटदारांप्रती सावत्रपणाने वागत आहे. आता आम्ही हे सहन करणार नाही, असा इशारा दिला.