
ठाणे जिल्हा एथलेटिक्स संघटनेचे जेष्ठ प्रशिक्षक आणि तांत्रिक अधिकारी सुशील इनामदार जागतिक एथलेटिक्स महासंघाची ब्रॉन्झ लेवल पंच परीक्षा उत्तीर्ण झालेत. ही परिक्षा पास होणारे सुशील इनामदार हे ठाण्यातील पहिले आणि महाराष्ट्रातील चौथे तांत्रिक अधिकारी आहेत. ही परिक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे सुशील इनामदार यांना आशियाई देशांमध्ये होणाऱ्या मैदानी स्पर्धामध्ये सुशील इनामदार यांना तांत्रिक अधिकारी म्हणून सहभागी होता येणार आहे.सुशील इनामदार गेली 35 वर्षे या क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील विविध मैदानी स्पर्धामध्ये तांत्रिक अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. पुण्यात झालेल्या युवा राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेदरम्यान दिवंगत राज्यसभा सदस्य सतीश प्रधान यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या देशव्यापी बॅटन दौडकरता मोलाची भूमिका बजावली होती.