Skip to content
October 6, 2025
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.

S9 TV NEWS

` S9 News
Primary Menu
  • HOME
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • क्रीडा
Live
  • Home
  • राजकीय
  • खासदार नरेश मस्के यांना संसद रत्न पुरस्कार प्रदान….

खासदार नरेश मस्के यांना संसद रत्न पुरस्कार प्रदान….

S9 TV NEWS July 26, 2025
IMG-20250726-WA0007.jpg
Like, Follow, Subscribe

केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते खासदार नरेश म्हस्के सन्मानित

देशाची राष्ट्रीय धोरणे, महाराष्ट्र राज्याचे हिताचे विषय आणि ठाणे लोकसभा मतदारसंघातील विकासकामांविषयी संसदेत अभ्यासपूर्व मांडणी करणारे खासदार नरेश म्हस्के यांना यंदाचा मानाचा संसद रत्न' पुरस्कार नवी दिल्ली येथे एका विशेष समारंभात केंद्रीय संसदीय कार्यमंत्री तथा अल्पसंख्यांक खात्याचे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. खासदारकीच्या आपल्या पहिल्याच टर्ममध्ये नरेश मस्के यांनासंसद रत्न’ पुरस्कार मिळाल्याने नरेश म्हस्के यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. पुरस्कार वितरण सोहळ्याला केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा असलेल्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे (एनसीबीसी) अध्यक्ष हंसराज गंगाराम अहिर, प्राइम पॉइंट फाउंडेशन आणि ई-मॅगझिन प्रेसेन्सचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. खासदार नरेश म्हस्के यांच्यासह महाराष्ट्रातील ७ खासदारांचा `संसद रत्न’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. शिवसेना मुख्यनेते आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भरभक्कम पाठिंबा, शिवसेना गटनेते खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केलेले मार्गदर्शन, दिलेले प्राधान्य यामुळेच आज हा पुरस्कार मला मिळाला आहे. या दोन्ही नेत्यांसह मला मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठवणारा मतदार राजा, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी, युवा कार्यकर्ते, माझे शिवसैनिक यांना या पुरस्काराचे मी श्रेय देत असल्याची प्रतिक्रिया नरेश म्हस्के यांनी संसद रत्न पुरस्कार स्विकारल्यानंतर दिली. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या सूचनेनुसार २०१० मध्ये प्राइम पॉइंट फाउंडेशन आणि ई-मॅगझिन प्रेसेन्स यांनी `संसद रत्न’ पुरस्काराची स्थापना केली. मे २०१० मध्ये चेन्नई येथे झालेल्या पहिल्या पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटन डॉ. कलाम यांनी केले होते. हे पुरस्कार नागरी समाजाच्या वतीने प्रदान केले जातात. भारतीय विद्यार्थी सेनेपासून नरेश म्हस्के यांचा राजकीय प्रवास सुरु झाला. नगरसेवक, सभागृह नेते, ठाणे महापौर ते ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास वाखाणण्याजोगा आहे. केंद्रीय गृहनिर्माण व नागरी व्यवहार समितीच्या स्थायी समितीचे सदस्य; वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 छाननीसाठी नेमण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीचे (जेपीसी) सदस्य; रेल्वे, प्रवासी जलवाहतूक, शहर सुधारणा आणि गृहनिर्माण समितीचे सदस्य म्हणून खासदार नरेश म्हस्के कामकाज पाहत आहेत. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर नरेश म्हस्के यांनी लोकसभेत केलेली अभ्यासपूर्ण भाषणे, संसदेतील त्यांची उपस्थिती, विविध केंद्रीय समित्यांवर केलेली कामे यामुळेच त्यांना यंदाचा `संसद रत्न’ पुरस्कार मिळाला आहे.

Continue Reading

Previous: बहिणींची राखी सातासमुद्रा पार राहणाऱ्या भावांपर्यंत पोहोचणार….
Next: एसटीच्या जागा भाडेतत्त्वावर देण्यास काँग्रेसचा विरोध….
  • FwZLKEnacAA0XiF
  • img-20250602-wa00015808276882074419283.jpg
  • 473241588_9184857851597815_2764842180287072871_n
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.
"Copyright © 2025 | S9 TV News | MoreNews by AF themes.