
लवकरात लवकर खड्डे बुजवले गेले नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेच्या वतीने मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिला आहे
ठाणे शहरातील खड्ड्यावरून मनसे आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे ठाण्यातील घोडबंदर रोडवर खड्ड्यांमुळे गेल्या सहा महिन्यात १९ नागरिकांचा जीव गेला आहे. त्यामुळे हे निष्पाप जीव नेमके कोणामुळे गेले असा प्रश्न मनसे नेते अविनाश जाधव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारला असून आज मनसेच्या वतीने घोडबंदर घाट परिसरात खड्ड्यांची पाहणी अधिकाऱ्यांसोबत करण्यात आली यावेळी पीडब्ल्यूडी, एमएसआरडीसी, एम एम आर डी ए ,टीएमसी अशा चारही विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन पाहणी करत खड्ड्यांची मोजमाप मेजर टेप घेऊन करण्यात आली जर येत्या एक महिन्यात जर खड्डे भरले नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिला आहे ठेकेदारांनी आत्महत्या न करता ज्या नेत्यांना टक्केवारीनुसार पैसे दिले आहेत त्यांची नावे जाहीर करावी असा सल्ला अविनाश जाधवांनी ठेकेदारांना दिला आहे तसेच यामध्ये कोणत्या बड्या अधिकाराच्या कुटुंबीयांचा जीव त्या खड्ड्यामध्ये गेला तर त्यांना जाग येईल का असा सवाल देखील जाधव यांनी उपस्थित केला आहे त्यामुळे घोडबंदर रोड गायमुख येथील खड्डे कधीपर्यंत भरले जातील ते पाहावं लागणार आहे…
यावेळी मनसे नेते अविनाश जाधव तसेच कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.