Skip to content
March 7, 2026
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.

S9 TV NEWS

` S9 News
Primary Menu
  • HOME
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • क्रीडा
Live
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पहिल्या स्पेस एज्युकेशन लॅब ची निर्मिती ठाण्यात होणार….

पहिल्या स्पेस एज्युकेशन लॅब ची निर्मिती ठाण्यात होणार….

S9 TV NEWS June 29, 2025
IMG-20250628-WA0047.jpg
Like, Follow, Subscribe

भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात `इस्रो’च्या स्पेस ट्यूटर प्रोग्राम अंतर्गत प्रयोगशाळेची स्थापना होणार…..

ठाण्यातील अंबर इंटरनॅशनल स्कूल' आणि भारतीय अवकाश संशोधन संस्था’ अर्थात इस्रोच्या स्पेस ट्यूटर प्रोग्राम अंतर्गत व्योमिका स्पेस अकॅडमी यांच्यात शनिवारी, 28 जून रोजी सामंजस्य करार करण्यात आला. या करारान्वये मुंबई महानगर क्षेत्रातील (एम. एम. आर.) पहिली स्पेस एज्युकेशन लॅब ठाण्यातील `अंबर इंटरनॅशनलस्कूल’ येथे लक्ष्मण कदम यांच्या नेतृत्वाखाली उभारण्यात येणार आहे.  ठाण्यातील तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील शालेय विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधन क्षेत्राची कवाडे खुली करून देण्याच्या हेतूने शारदा एज्युकेशन सोसायटीच्या अंबर इंटरनॅशनल स्कूल येथे स्पेस एज्युकेशन लॅबनिर्मित करण्यात येणार आहे. यावेळी अंतराळ संशोधन क्षेत्राचे अभ्यासक डॉ. प्रतीक मुणगेकर, व्योमिका स्पेस अकॅडमीचे गोविंद यादव, शारदा एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. प्रदीप ढवळ, अंबर इंटरनॅशनल स्कूलचे संचालक लक्ष्मण कदम, शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास ठुसे, कल्पेश जाधव (प्रोग्रॅम आणि अॅडमीन हेड), दिलीप त्रिपाठी यांच्यासह दूरदृश्यप्रणाली द्वारे इस्रोचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. टी एन सुरेशकुमार तसेच अंबर इंटरनॅशनल स्कूलमधील मधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक विद्यार्थी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी अंबर इंटरनॅशनल स्कूलचे संचालक लक्ष्मण कदम यांनी देखील आपली भूमिका मांडली. ही स्पेस लॅब विद्यार्थ्यांसाठी सहभागशील करण्याच्या दृष्टीने भर देणार असल्याने त्यांनी यावेळी सांगितले. आमचा उद्देश भावी अंतराळवीर, अॅस्ट्रोफिजीसिस्ट, स्पेस सायंटिस्ट आणि एअरोस्पेस इंजिनिअर्स घडवण्याचाआहे, असे संचालक लक्ष्मण कदम यांनी यावेळी नमूद केले. व्योमिका स्पेस अकॅडमीचे गोविंद यादव यांनी या लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधन क्षेत्राची मूलभूत ओळख होईल आणि विद्यार्थी या क्षेत्राकडे आकर्षित होतील असा विश्वास व्यक्त केला. या उपक्रमासाठी पुढाकार घेणारे अंतराळ संशोधक क्षेत्राचे अभ्यासक प्रा. डॉ. प्रतीक मुणगेकर यावेळी म्हणाले की, शिक्षण हे सामाजिक गतिशीलतेचे साधन असून त्याद्वारे विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या दृष्टीने सशक्त बनवणे आणि त्यांच्यासाठी व्यावसायिकसंधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात अंतराळ संशोधन क्षेत्रासंदर्भात पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने प्रतिभा आणि गुणवत्ता असूनही याक्षेत्रात राज्याचे प्रतिनिधित्व कमी दिसून येते. विद्यार्थ्यांना शालेय वयातच अंतराळ संशोधन क्षेत्राची ओळख करून देणाऱ्या विशेष पायाभूत सुविधा आणि मार्गदर्शन उपलब्ध करून दिल्यास याक्षेत्रात मराठी टक्का वाढेल, असा विश्वास डॉ.मुणगेकर यांनी यावेळी व्यक्त केला. महाराष्ट्र हे औद्योगिक आणि शैक्षणिकदृष्ट्या प्रगत राज्य असून देशाच्या अंतराळ क्षेत्रात मोठे योगदान देण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे. शाळांमध्ये स्पेससायन्स आणि इनोव्हेशन लॅब्स स्थापल्यास ग्रामीण व शहरी अशा दोन्ही विभागातील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या जगाशी जोडता येईल असे डॉ.मुणगेकर यांनी याप्रसंगी सांगितले. शारदा एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा.डॉ.प्रदीप ढवळ यांनी या स्पेस लॅबच्या माध्यमातून शिक्षण रंजक आणि प्रेरणादायी करण्याचा उद्देश असल्याचे स्पष्ट केले. प्राध्यापक डॉ. ढवळ म्हणाले की, महाराष्ट्राला डॉ.जयंत नारळीकर, डॉ.अनिल काकोडकर, डॉ.रघुनाथ माशेलकर अशी थोर विज्ञान संशोधकांची उज्वल परंपरा आहे. त्यांची प्रेरणा असे उपक्रम राबवताना आमच्या समोर आहे. त्यातूनच मुंबई महानगरक्षेत्रातील पहिली स्पेस एज्युकेशन लॅब ही अंबर इंटरनॅशनल स्कूल येथे उभी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या मानका नुसार ही प्रयोगशाळा उभी करण्यात येईल आणि मान्यवर शास्त्रज्ञ व संशोधकांचे मार्गदर्शन या माध्यमातून ठाण्यातील विद्यार्थ्यांना होईल, असा विश्वास प्रा.डॉ.ढवळ यांनी या निमित्ताने व्यक्त केला. यावेळी इस्रोचे प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ.टी एन सुरेश कुमार यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित राहून या सामंजस्य कराराबद्दल संबंधितांचे अभिनंदन करून प्रयोगशाळेच्या निर्मितीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी ते म्हणाले की, अशा प्रयोगशाळांमुळे भारताचे अंतराळ संशोधन क्षेत्रातील भविष्य उज्वल होणार आहे. या प्रयोगशाळांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता आणि विज्ञानाची आवड निर्माण होईल, असा विश्वास डॉ.टी. एन.सुरेशकुमार यांनी व्यक्त केला.

Continue Reading

Previous: वाराणसी येथील शास्त्र संग्रहालय आणि अनुसंधान केंद्राचे उद्घाटन….
Next: देशातील पहिल्या ई ट्रॅक्टरची नोंदणी ठाण्यात पार पडली…..
  • FwZLKEnacAA0XiF
  • img-20250602-wa00015808276882074419283.jpg
  • 473241588_9184857851597815_2764842180287072871_n
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.
"Copyright © 2025 | S9 TV News | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

LinkedIn

WhatsApp

Copy Link
×