Skip to content
July 6, 2025
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.

S9 TV NEWS

` S9 News
Primary Menu
  • HOME
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • क्रीडा
Live
  • Home
  • ताज्या बातम्या
  • मुंबई सीमा शुल्क विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 11.88 कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा केला जप्त

मुंबई सीमा शुल्क विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 11.88 कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा केला जप्त

S9 TV NEWS June 24, 2025
Like, Follow, Subscribe

सीमाशुल्क विभागाने मिळालेल्या विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत, 21.06.2025 रोजी, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई सीमाशुल्क विभाग झोन III येथील अधिकाऱ्यांनी बँकॉकहून आलेल्या दोन भारतीय नागरिकांना अडवले. त्यांच्या चेक-इन केलेल्या सामानाची तपासणी केली असता अधिकाऱ्यांना त्यात हवाबंद केलेली अनेक पाकीटे सापडली. या प्रवाशांनी वाहून आणलेल्या ट्रॉली बॅगमध्ये ठेवलेल्या उशाच्या अभ्र्यामध्ये हा अवैध पदार्थ लपवण्यात आला होता. या पाकिटांमध्ये हिरव्या रंगाचा पदार्थ होता, जो प्राथमिकदृष्ट्या हायड्रोपोनिक गांजा असल्याचे आढळले. एकूण 11.881 किलोग्रॅम निव्वळ वजन असलेल्या या अमली पदार्थाची बेकायदेशीर बाजारातील अंदाजे किंमत 11.88 कोटी रुपये आहे. या दोन्ही प्रवाशांना अमली पदार्थ आणि मनावर परिणाम करणारे पदार्थ (एनडीपीएस) कायदा, 1985 च्या संबंधित तरतुदींनुसार अटक करण्यात आली आहे. या तस्करीच्या प्रयत्नात सहभागी असलेल्या मोठ्या जाळ्याची ओळख पटवण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

Continue Reading

Previous: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला स्थानिक काश्मिरी नागरिकांशी संवाद…
Next: सायकलिंग करत 10 लाख किलोमीटरहून अधिक प्रवास करून विक्रम केला प्रस्थापित
  • FwZLKEnacAA0XiF
  • img-20250602-wa00015808276882074419283.jpg
  • 473241588_9184857851597815_2764842180287072871_n
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.
"Copyright © 2025 | S9 TV News | MoreNews by AF themes.