
विविध क्षेत्रातील १० मान्यवरांचा धनगर रत्न पुरस्काराने सन्मान
धनगर प्रतिष्ठान, ठाणे जिल्हा व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ यांच्या वतीने रविवारी ठाणे महापालिका मुख्यालयातील कै नरेंद्र बल्लाळ सभागृह “धनगररत्न पुरस्कार” सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या धनगर समाजातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाला खासदार नरेश म्हस्के,आमदार संजय केळकर,महावितरणचे संचालक मुरहरी केळे,उद्योजक संदेश कवितके,माजी नगरसेविका नंदिनी विचारे,कोकण विभागीय नागरी पगारदार सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या संचालक दर्शना योगेश जानकर,जेष्ठ पत्रकार सुभाष बोंद्रे,सुप्रसिद्ध शिल्पकार शरद मालणकर, समाजाचे जेष्ठ नेते बाबासाहेब दगडे,प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे ,महिला मंडळाच्या अध्यक्ष माधवी बारगीर आदींसह मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते धनगर रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले यामध्ये संदीप पांढरे (क्रीडा), डॉ अशोक माने ( वैद्यकीय), नीता राजेश वारे (शासकीय),विक्रांत समासे (उद्योजक),अखिलेश पाल ( सामाजिक ),प्रदीप शेंडगे (राजकीय), सुभाष बोंद्रे (पत्रकारिता), प्रदीप जानकर (शैक्षणिक), बिरू खांडेकर (कला) पुण्यश्लोक अहिल्यादेवी मित्र मंडळ, मुलुंड म्हाडा कॉलनी, मुंबई (सामाजिक संस्था) यांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला .तसेच बाबासाहेब दगडे,दर्शना योगेश जानकर,प्रमोद वाघमोडे, दादासाहेब कर्णवर, अप्पासाहेब शेळके,अनिल जरग व दहावी,बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार नरेश म्हस्के यांनी अहिल्यादेवींच्या जीवनकार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपले विचार मांडले. ३१ मे १७२५ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावात जन्मलेल्या अहिल्याबाई एक सामान्य कुटुंबातील मुलगी होत्या. पण त्यांच्या विचारांची खोली, नेतृत्वाची ताकद आणि जनसेवेची निष्ठा इतकी महान होती, की त्या इतिहासात अजरामर झाल्या. मंदिरांचे जिर्णोद्धार, धर्मशाळा, अन्नछत्रं, पाणपोया यांची उभारणी हे केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक काम होते. त्या काळात इंदूरचं राज्य न्याय आणि समृद्धीचं प्रतीक बनलं. त्यांचा दरबार हा गरीब, महिलांनाही न्याय देणारा होता. तीनशे वर्षांपूर्वीचं त्यांच्या कृतीतून महिलांचे सशक्तीकरण घडलं होतं हे विशेष आहे. त्यांची दूरदृष्टी, नीतिमत्ता आणि कणखर नेतृत्व हे आजच्या समाजासाठी आणि विशेषतः महिलांसाठी एक प्रेरणास्रोत आहे.असे यावेळी म्हस्के म्हणाले. आमदार संजय केळकर यांनी देखीलआपल्या भाषणात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करताना सर्वांनीच अहिल्यादेवींच्या आदर्श घेतला पाहिजे असे सांगितले. अहिल्यादेवींनी देव,देश,धर्मासाठी अफाट असे काम केले हे काम देश परदेशात पोहचले पाहिजे इतके मोठे काम अहिल्यादेवी होळकर यांनी केले.३०० व्या जयंतीनिमित्ताने मी स्वतः अहिल्यादेवी होळकर यांनी मराठवाड्यात बांधलेल्या अनेक मंदिरात जाऊन माथा टेकवत आहिल्यादेवींना नमन केल्याचं त्यांनी सांगितले.तसेच अहिल्यादेवी होळकर यांनी ज्या ज्याठिकाणी कामे केले आहेत त्याठिकाणी प्रतिष्ठानने नागरिकांना घेऊन जावे त्यासाठी आम्ही सहकार्य करू असे यावेळी केळकर म्हणाले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष महेश गुंड,सचिव तुषार धायगुडे ,खजिनदार अनिल जरग,उपाध्यक्ष कुमार पळसे,राजेश वीरकर,प्रचारप्रमुख सचिन बुधे,उपखजिनदार सुरेश भांड,सल्लागार दिलीप कवितके, सूर्यकांत रायकर,मनोहर वीरकर,प्रसाद वारे,कार्यकारणी सदस्य गणेश बारगीर,अविनाश लबडे,राजेश वारे,दीपक झाडे,संतोष बुधे,संतोष दगडे,उत्तम यमगर,अंकुश उघाडे,प्रमोद वाघमोडे,उद्धव गावडे,महेश पळसे,अनिकेत पाडसे,आर्यन गुंड, साई बुधे,महिला मंडळाच्या उपाध्यक्ष संगीता खटावकर,सचिव गायत्री गुंड,खजिनदार भारती पिसे,उपसचिव सुजाता भांड,उपखजिनदार सुषमा बुधे,सल्लगार मीना कवितके,सदस्य शीतल डफळ,वंदना वारे,अमृता बुधे,सीमा कुरकुंडे,मनीषा शेळके,रंजना यमगर,स्मिता गावडे,शुभांगी उघाडे,रिचा कुलाळ,सुजाता बुधे आदींसह कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.