Skip to content
July 7, 2025
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.

S9 TV NEWS

` S9 News
Primary Menu
  • HOME
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • क्रीडा
Live
  • Home
  • ताज्या बातम्या
  • म्हाडाचे रहिवासी 15 वर्षानंतरही हक्कांच्या घराच्या प्रतीक्षेत…

म्हाडाचे रहिवासी 15 वर्षानंतरही हक्कांच्या घराच्या प्रतीक्षेत…

S9 TV NEWS June 15, 2025
IMG-20250614-WA0021.jpg
Like, Follow, Subscribe

ठाण्यातील हिरानंदानी मेडोज महाराष्ट्र नगर येथील म्हाडा चे रहिवासी १५ वर्ष उलटूनही हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत
ठाण्यातील हिरानंदानी मेडोज महाराष्ट्र नगर येथील म्हाडा चे रहिवासी १५ वर्ष उलटूनही हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत आहेत. विकासक अजूनही या रहिवाशांना तारखाच देत आहेत.
२४ जानेवारी २०२५ ला पुन्हा कमिटीची मीटिंग झाली, त्यात बांधकाम फेब्रुवारीमध्ये जोमात सुरू होईल असे विकासकाने सांगितले. त्यानंतर २३ फेब्रुवारीला सर्व रहिवाश्यां समोर त्यांनी मार्च संपेपर्यंत कामाला जोरात सुरुवात होईल असे सांगितले. नवीन ईमेलनुसार रहिवाश्यांना ऑगस्ट संपेपर्यंत वाट बघायला सांगितले आहे. १५ वर्ष झाले, तरी विकासक रहिवाश्यांना तारीखच देत आहेत. विकासक फक्त तारीखच देणार की बांधकाम करून घर पण देणार? हा विचार, हा संभ्रम लोकांचे चित्त विचलित करत आहे. याचा लोकांना मानसिक त्रास होत आहे. याचा निषेध म्हणून शनिवार सकाळी  सर्व रहिवाशांनी शांततापूर्ण आंदोलन केल. या आंदोलनात स्थानिक माजी नगरसेविका  स्नेहा आंब्रे, रमेश आंब्रे तसेच आमदार संजय केळकर ह्यांची प्रमुख उपस्थिती होती.  सदर परिसरातील रहिवाश्यांनी आमदार संजय केळकर व स्नेहा आंब्रे, रमेश आंब्रे यांच्या समोर आपली कैफियत मांडली. या आंदोलनात आमदार संजय केळकर, यांच्यासह स्थानिक माजी नगरसेविका स्नेहा आंब्रे, रमेश आंब्रे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.तर यावेळी आपण या विषयात विशेष लक्ष घालून हया विषयावर आवाज उठवून सदर प्रश्न मार्गी लावणार असल्याचे यावेळी आमदार संजय केळकर यांनी सांगितले.

Continue Reading

Previous: सेवाभावातून उभ्या राहिलेल्या नेतृत्वाचा शिवसेनेत दमदार प्रवेश; ठाण्यात पार पडला ऐतिहासिक सोहळा
Next: धनगर रत्न पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न…
  • FwZLKEnacAA0XiF
  • img-20250602-wa00015808276882074419283.jpg
  • 473241588_9184857851597815_2764842180287072871_n
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.
"Copyright © 2025 | S9 TV News | MoreNews by AF themes.