
कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जणाऱ्या लोकल रेल्वेगाडीतून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. लोकलमधील प्रचंड गर्दीमुळे काही प्रवासी डब्याच्या दरवाजाला लटकून प्रवास करत होते. एक लोकल ट्रेन या ट्रेनच्या बाजूने डाऊन दिशेने (सीएसएमटीहून) जात होती. त्यावेळी दरवाजात उभे असलेले प्रवासी बाजूने जाणाऱ्या लोकलला घासले गेले आणि खाली पडले, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.
रेल्वेमधून प्रवासी पडल्याचं पाहून काही प्रवाशांनी आरपीएफला याबाबतची माहिती दिली. त्यानंतर या जखमी प्रवाशांना कळव्यातील रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, पाच प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.कसारा येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने लोकल निघाली होती. या लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. रेल्वेगाडी मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ आली असता, सीएसएमटीहून डाऊन दिशेने जाणारी लोकल समोरून आली. दोन्ही लोकल गाड्या बाजूने जात होत्या. मात्र कसारा-सीएटएमटी लोकलच्या दरवाजात उभे असलेले प्रवासी बजूने जाणाऱ्या लोकलला घासले गेले, त्यांच्या बॅगा या डाऊन दिशेने जाणाऱ्या लोकलच्या बाहेरील भागावर आदळल्या आणि13 प्रवासी खाली पडले. एकामागून एक असे 13 प्रवासी लोकलमधून खाली पडले. त्यापैकी पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर तिघेजण जखमी असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. या तिघांची रुग्णालयात मृत्यूशी झुंज चालू आहे.
