Skip to content
November 29, 2026
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.

S9 TV NEWS

` S9 News
Primary Menu
  • HOME
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • क्रीडा
Live
  • Home
  • ताज्या बातम्या
  • विनोद कांबळी आणि कुटुंबियांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट

विनोद कांबळी आणि कुटुंबियांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट

S9 TV NEWS November 28, 2026
Like, Follow, Subscribe

माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळीच्या उपचारांसाठी शिवसेना देणार मदतीचा हात

वैद्यकीय उपचारासह दोन्ही मुलांचे शैक्षणिक पालकत्वही स्वीकारणार

मुंबई दि. २८ :- माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळीवर वैद्यकीय उपचार करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला असून, त्यांना पूर्ण बरे वाटेपर्यंत त्यांचावर उपचार करण्याची जबाबदारी शिवसेनेने घेतली असल्याचे शिंदे यांनी आज त्यांना सांगितले. विनोद आणि त्यांच्या कुटुंबियांनी आज उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी येऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना कांबळी यांनी ही माहिती दिली.

या भेटीवेळी विनोद यांच्यासह त्यांच्या पत्नी अँड्रिया हेविट आणि त्यांची मुले जीजस कांबळी आणि
जोहाना कांबळी आणि एमसीएचे जगविख्यात पीच क्युरेटर नदीम मेमन हेदेखील उपस्थित होते.

विनोद यांच्या मेंदूमध्ये रक्ताची गाठ झाल्याने ते गेल्या काही वर्षापासून आजारी आहेत. त्यांना ब्रेन स्ट्रोक येण्याचा धोका निर्माण झाला आहे. या त्रासामुळे स्मरणशक्ती कमी होणे आणि इतर आरोग्यविषयक समस्यांचा त्यांना सामना करावा लागत आहे. या आजाराचा सामना करण्यासाठी प्रदीर्घ उपचारांची गरज असल्याचे त्याने या भेटीत शिंदे यांना सांगितले. यावेळी शिंदे यांनी त्यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात लागतील ते सर्व उपचार करु असे सांगून त्यांना आश्वस्त केले. तसेच त्याच्या दोन्ही मुलांची शैक्षणिक जबाबदारी देखील घेऊन त्यांच्या शिक्षणात खंड पडू देणार नाही असे सांगून त्याला आणि त्याच्या कुटुंबियांनाही याबाबत आश्वस्त केले.

विनोद यांचा मुलगा जीजस कांबळी हादेखील त्यांच्याप्रमाणेच डावखुरा क्रिकेटपटू असून तोही सध्या शालेय स्तरावर क्रिकेट खेळत असल्याचे त्याने शिंदे यांना सांगितले. त्याला हवे तेवढे खेळू देत या क्षेत्रात त्याला जेवढे पुढे जाता येईल आणि त्यासाठी लागेल ती सर्व मदत करण्याबाबत शिंदे यांनी यावेळी विनोद यांना आश्वस्त केले. शिंदे यांच्या भेटीने मला समाधान वाटले असून माझ्या उपचारासाठी तसेच मुलांच्या शिक्षणासाठी पैसे कुठून आणायचे याची चिंता दूर झाली असल्याचे कांबळी यांनी सांगितले.

…..

Continue Reading

Previous: एनएसजीच्या ‘#NEVEREVER’ सोहळ्यात 26/11 च्या हुतात्म्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन
  • FwZLKEnacAA0XiF
  • img-20250602-wa00015808276882074419283.jpg
  • 473241588_9184857851597815_2764842180287072871_n
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.
"Copyright © 2025 | S9 TV News | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

LinkedIn

WhatsApp

Copy Link
×