Skip to content
November 27, 2026
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.

S9 TV NEWS

` S9 News
Primary Menu
  • HOME
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • क्रीडा
Live
  • Home
  • ताज्या बातम्या
  • एनएसजीच्या ‘#NEVEREVER’ सोहळ्यात 26/11 च्या हुतात्म्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

एनएसजीच्या ‘#NEVEREVER’ सोहळ्यात 26/11 च्या हुतात्म्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

S9 TV NEWS November 26, 2026
Like, Follow, Subscribe

‘हा घाबरणारा भारत नाही, दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर देणारा भारत आहे’

मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याने देशाच्या मनावर उमटलेली जखम आजही कायम आहे. मात्र, हुतात्म्यांच्या अतुलनीय शौर्याने आणि मुंबई पोलिसांसह एनएसजी कमांडोंच्या धाडसी कारवाईने दहशतवाद्यांना भारताची ताकद दाखवून दिली. हा डरनेवाला भारत नाही, तर दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर देणारा आणि गरज पडल्यास घरात घुसून मारणारा नवा भारत आहे, असा ठाम संदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.

गेटवे ऑफ इंडिया येथे 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या स्मृतिदिनानिमित्त एनएसजीच्या ‘#NEVEREVER’ स्मृती आणि शपथ सोहळ्यात हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करताना ते बोलत होते. यावेळी एनएसजी डायरेक्टर जनरल श्रीनिवासन, मेजर जनरल मुकेश गढवाल, फोर्स वनचे महासंचालक एस. जयकुमार आणि शहीद पोलीस तसेच नागरिकांच्या कुटुंबातील सर्व सदस्य आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात प्राणांची आहुती देणाऱ्या जवान, पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या शौर्याला सलाम केला. हुतात्म्यांच्या कुटुंबीयांप्रती महाराष्ट्र सरकारच्या वतीने त्यांनी संवेदना व्यक्त केल्या.

26/11 च्या हल्ल्यात मेजर संदीप उन्नीकृष्णन, हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर आणि तुकाराम ओंबळे यांच्यासह अनेक शूरवीरांनी देशासाठी प्राण अर्पण केले. तुकाराम ओंबळे यांनी प्राणांची पर्वा न करता दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडण्यात बजावलेली भूमिका ही भारतीय पोलिसांच्या शौर्याची अभिमानास्पद गाथा आहे. कसाबला जिवंत पकडल्यामुळे पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांचा चेहरा जगासमोर उघड झाला, असे शिंदे यांनी अधोरेखित केले.

मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला तेव्हा मुंबई पोलीस आणि एनएसजी कमांडोंनी शहराच्या सुरक्षेसाठी प्राणपणाने लढा दिला. त्यांच्या शौर्यामुळे हजारो नागरिकांचे प्राण वाचले. मुंबई पुन्हा उभी राहिली आणि दहशतवाद्यांना भारताची ताकद काय आहे हे जगाला दाखवून दिले. मुंबई पोलीस, एनएसजी कमांडो आणि सुरक्षा यंत्रणांचे योगदान शब्दांत व्यक्त करणे शक्य नाही. त्यांच्या त्यागाला आणि धैर्याला आपण सदैव नतमस्तक राहिले पाहिजे, असेही ते म्हणाले.

2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी देशाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा, गुप्तचर यंत्रणा आणि संरक्षण व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली अंतर्गत सुरक्षा मजबूत करण्यासाठी व्यापक प्रयत्न सुरू आहेत. देशाच्या सीमांकडे वाकडी नजर करून पाहणाऱ्यांना भारतीय सैन्य त्याच भाषेत उत्तर देण्यास सक्षम आहे. एअर स्ट्राइकसारख्या कारवायांनी भारताची बदललेली भूमिका जगाला दाखवून दिली आहे. निषेध आणि निंदा करून थांबणारा नव्हे, तर दहशतवादाला निर्णायक प्रत्युत्तर देणारा हा नवा भारत आहे, असे शिंदे यांनी ठामपणे सांगितले.

देशाची सुरक्षा ही केवळ सुरक्षा यंत्रणांची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचेही कर्तव्य आहे. देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व जपण्यासाठी आपण सर्वांनी सजग राहिले पाहिजे. मानवतेच्या शत्रूंना कधीही माफ करता येणार नाही. हुतात्म्यांचे बलिदान आणि त्यांचे शौर्य देश कायम स्मरणात ठेवेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

या भावपूर्ण सोहळ्यात हुतात्म्यांचे वीरपत्नी, वीरमाता, कुटुंबीय, सुरक्षा दलांचे अधिकारी, मुंबई पोलीस आणि मुंबईकर उपस्थित होते. हुतात्म्यांना नमन करताना शिंदे यांनी ‘जिनकी वजह से आज हमारी जिंदगी है, उन शहीदों के हम कर्जदार हैं’ या शब्दांत वीर जवानांच्या त्यागाचे स्मरण केले.

Continue Reading

Previous: लोकप्रतिनिधींच्या कामाचा दस्तऐवज समाजासाठी दिशादर्शक ठरेल- एकनाथ शिंदे
  • FwZLKEnacAA0XiF
  • img-20250602-wa00015808276882074419283.jpg
  • 473241588_9184857851597815_2764842180287072871_n
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.
"Copyright © 2025 | S9 TV News | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

LinkedIn

WhatsApp

Copy Link
×