ठाण्यातील सेंट लॉरेन्स हायस्कूल, शिवाजी नगर येथे आयोजित या कार्यक्रमात सुप्रसिद्ध , तज्ञ मार्गदर्शक गणेश शिंदे आणि विवेक वेलणकर यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवासाबाबत मार्गदर्शन केले. करिअर निवड, अभ्यासक्रम, शिष्यवृत्ती आणि स्पर्धा परीक्षा याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शकांनी सखोल माहिती दिली. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी योग्य दिशा मिळाली.

कार्यक्रमात शिवसेना सचिव संजय मोरे ,माजी नगरसेविका सुखदा मोरे यांच्या हस्ते यावेळी दहावी व बारावीमध्ये उत्तम गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना टॅब व स्मार्ट वॉच भेट वस्तू म्हणून देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. पालकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले.
शिवसेना पक्ष आणि शिक्षण यांची एक अनोखी नाळ या राज्यातील नागरिकांनी डोळ्यादेखत पाहिली आहे. धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेली सराव परीक्षा , गरजू गरीब असो की श्रीमंत त्यांना चांगले शिक्षणासाठी पाहिजे असणारे ऍडमिशन व इतर शैक्षणिक बाबी त्याची जाणीव ठेवत आतापर्यंत अखंडित जनसेवा सूरु ठेवणारे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या बद्दल जनतेनी स्वतः अनुभव घेतले आहे .शिवचैतन्य मित्र मंडळ विभागातील नागरिकांसाठी गेली ५०-५५ वर्षे अनेक समाज उपयोगी कार्यक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. आणि त्याचाच एक भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे यावेळी आयोजक शिवसेना सचिव संजय मोरे यांनी सांगितले.