
अपेक्षित वेळेपूर्वीच देशात दाखल झालेला मान्सून केरळनंतर वेगाने आगेकूच करत सोमवारी मुंबईत धडकला. मुंबईत मान्सून दाखल होण्याचे सर्व निकष पूर्ण झाले असून, गेल्या 75 वर्षांमधील मान्सूनचा हा विक्रमी प्रवास आहे. एरवी मान्सूनच्या आगमनाने सुखावणाऱ्या मुंबईकरांना या पावसाने अक्षरशः जेरीस आणले. मान्सूनने आगमनालाच दाणादाण उडवल्याने यंत्रणांची पुरेशी तयारी नसल्याचे उघड झाले.