
८ जून २०२५ रोजी दक्षिण आफ्रिकेत कॉम्रेड मॅरेथॉन ची फिनिश लाईन पार केली आणि झर्रकन डोळ्यासमोरन मागील काही वर्ष गेली. Oldest Longest and Toughest असं या मॅरेथॉन च वर्णन करण्यात येत. The Ultimate Human Race अस देखील हिला बोलण्यात येत. कस लावणाऱ्या विषम हवामानात ९०किमी अंतर १२ तासात पार करायचं असत जे आपल्या सर्वांच्या सदिच्छांमुळे आणि देवाच्या कृपेमुळे ९ तास ४१ मिनिटात पार करू शकलो. या वर्षीची आवृत्ती पीटरमॅरिट्झबर्ग ते डर्बन पर्यंतची “डाउन रन” होती.
माझ मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील भराडे वाडी, रसाळगड, तालुका (खेड) आहे.नोकरीसाठी ठाण्यात आलो माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, कंपनीमध्ये कामाला लागलो आणि गेली काही दशक ठाण्यात आहे. अर्थात गावाला कायम जाण होतच. माझा धावण्याचा प्रवास २०२२.त्यानंतर मी ६ महिने सीताराम नंदोस्कर सर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई मॅरेथॉन ३ तास ४७ मिनिटांत पुर्ण केली. गेले काही महिने , कॉम्रेड करीता मी दिपक बुधराणी सर व त्याचा कोचिंग पार्टनर आशिष बोधनकर यांच्यासोबत प्रशिक्षण घेत होतो . त्यांनी दिलेले प्लॅनिंग आणि वर्क आऊट माझी नोकरी सांभाळून करत होतो. २०२२ पासून मी जिथे कुठे धावलो तिथे धावताना कॉम्रेड करायची आहे हा एक विचार सतत माझ्या मनात होता अगदी त्यापद्धतीने मी तशा प्रकारच्या मॅरेथॉन मधे सहभागी झालो. टाटा मुंबई मॅरेथॉन मधे सब ४ टायमिंग आल आणि माझा आत्मविश्वास दुणावला. मागील वर्षी प्रथमच मी कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन चा Ambassador झालो आणि माझ्या ओळखीतील अनेकांना तिथे येण्यासाठी प्रोत्साहित केले. त्या सर्वांची जबाबदारी माझ्यावर होती आणि एक वेगळी कल्पना माझ्या मनात आली मी माझा स्पीड कमी केला माझ्या बरोबर आलेल्या सर्व सहभागी धावपटू ना पुढे जाऊ दिले आणि सर्व पुढे गेले याची खात्री पटल्यावर पुन्हा एकदा पेस पकडला. माझ्या कोकणातले नागमोडी चढ उताराच्या रस्त्यावर कोणी घाबरू नये, सुरेश आम्हाला घेऊन आला आणि पुढे गेला अस कोणाला वाटू नये हा उद्देश त्याच्यामागे होता. पुन्हा एकदा पेस पकडून माझ्या बरोबरच्या सर्वांना ५ किमी ते १० किमी मधे गाठले. सर्वजण त्या रुट बरोबर नीट सरावले आहेत हे लक्षात आल आणि मग मी स्ट्राँग फिनिश करून पोडियम मिळवल. तिथे पोडियम ज्यांना मिळाल असे अनेकजण कॉम्रेड करून आले होते त्यातील एक जण म्हणाले ही कॉम्रेड सारखा रूट असणारी हाफ मॅरेथॉन आहे.पुन्हा एकदा डोक्यात कॉम्रेड चा ध्यास उफाळून आला आणि पुन्हा जोरात Practice सुरू झाली. लोणावळा अल्ट्रा धावलो. दीपक बुधराणी सर दर महिन्याला लोणावळा प्रॅक्टिस लावायचे
ती कधी चुकवली नाही. कोकणात मूळ असलेल्या माझ्यासारख्याला चढ उतार काही नवीन नव्हते पण ९० किमी अंतर करू ना ?? ही एक शंका होती.
पण सराव इतका झाला की आत्मविश्वास दुणावला. मॅरेथॉन दरम्यानची परिस्थिती अत्यंत उष्ण आणि दमट होती, ज्यामुळे धावणे आणखी आव्हानात्मक झाले. ३५-४० किमीच्या आसपास, माझ्यासह जवळजवळ सर्व धावपटूंना पेटके येऊ लागले. मी शर्यत अतिशय स्पीड मधे सुरू केली होती, परंतु ३९ किमीच्या टप्प्यावर, माझ्या पायात खूप पेटके येऊ लागले. धावण खूप कठीण जात होत पण मन खंबीर ठेऊन मी पुढे जात राहिलो नीट हायड्रेट रहायचं प्रयत्न केला आणि पेटके कंट्रोल मधे आले. ही मॅरेथॉन पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनत, समर्पण आणि शिस्त आवश्यक होती—यामध्ये सकाळी उठून असंख्य सराव सत्रे आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या हवामान परिस्थितीचा अनुभव घेण्यासाठी प्रशिक्षण समाविष्ट होते. हा एक लांब आणि कसोटीचा प्रवास होता, परंतु मला अभिमान आहे की तो यशस्वीपणे पूर्ण झाला. मी हा विजय माझे प्रशिक्षक दीपक बुधराणी सर यांना मनापासून समर्पित करतो, जे माझ्यासोबत होते—प्रत्येक टप्प्यावर मला प्रेरणा देत होते, मार्गदर्शन करत होते आणि धीर देत होते . मी ही मॅरेथॉन पूर्ण करू शकतो असा आत्मविश्वास देणारे ते पहिले व्यक्ती होते. आम्ही दोघांनी एकाच वेळी अंतिम रेषा ओलांडली. मी ही कामगिरी माझ्या कुटुंबाला देखील समर्पित करतो, जे नेहमीच माझ्या मागे खंबीरपणे उभे राहिले आहेत. दीपक देवरे सरांचा सतत पाठिंबा असतो आणि प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांचे देखील विशेष आभार. ज्यांच्या आशीर्वाद आणि शुभेच्छांमुळे मला ही शर्यत जिंकण्यास मदत झाली त्या सर्वांचा मी तितकाच आभारी आहे.दीपक देवरे सर आणि माझे सर्व मित्र मला एयरपोर्ट वर घ्यायाला आले होते ते पाहून एकदम भरून आल. या वर्षीच्या कॉम्रेड्स मॅरेथॉनमध्ये भारतातील एकूण ४१४ धावपटूंनी भाग घेतला. माझ्या वयोगटातील गटात मला चौथे स्थान मिळाल्याचा अभिमान आहे. याशिवाय, कॉम्रेड्स मॅरेथॉनच्या इतिहासात सहभागी होऊन रॉबर्ट मिशेल पदक जिंकणारा पहिला शारीरिकदृष्ट्या दिव्यांग व्यक्ती होण्याचा मला सन्मान मिळाला . यामुळे ही कामगिरी अजूनच उजळून निघाली. वेगवेगळ्या देशांतील लोकांना भेटणे हा एक अविश्वसनीय अनुभव होता आणि या दौऱ्याने मला जीवनाचे अनेक मौल्यवान धडे शिकवले… अनेक मित्र मिळाले . पुन्हा एकदा, तुमच्या प्रेमासाठी, आशीर्वादांसाठी आणि अटळ पाठिंब्यासाठी सर्वांचे आभार. मी आता भविष्यात अधिक मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यास उत्सुक आहे – त्याच तीव्रतेने, उत्कटतेने आणि मानसिकतेने.